मुंबई : अजिंक्य रहाणेची तुफानी फटकेबाजी यावेळी मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरली. कारण मुंबईने१५८ धावांचे आव्हान चेन्नईला दिले होते आणि पहिल्याच षटकात त्यांनी चेन्नईच्या सलामीवीराला शून्यावर बाद केले होते. पण त्यानंतर मात्र अजिंक्यच्या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईला त्यांच्याच मैदनात धुळ चारली. मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सनेदमदार विजय साकारला. मुंबईला या सामन्यात चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीही करता आली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सलाया सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. चेन्नईने हा सामना सात विकेट्स राखून जिंकला आणि त्यासह या सामन्यात दोन गुणांची कमाई केली.मुंबईच्या १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांना पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे यावेळी चौथ्याच चेंडूवर बाद झाला. पण त्यानंतर मैदानात आले ते अजिंक्य रहाणेचे वादळ. आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर अजिंक्यने मुंबईच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. अजिंक्यने यावेळी २७ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली आणि चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर चेन्नईच्या अन्य फलंदजाांनी त्यावर कळस चढवत संघाला विजय मिळवून दिला.मुंबईच्या संघाची सुरुवात रोहित शर्माने दणक्यात करून दिली होती. रोहितने तीन चौकारांसह एक षटकारही फटकावला होता. पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने १३ चेंडूंत २१ धावा केल्या, रोहित बाद झाल्यावर इशान किशनने काही काळ दमदार फटकेबाजी केली. इशानने यावेळी २१ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ३२ धावा केल्या. इशानला जडेजाना बाद केले आणि त्यानंतर एकामागून एक मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीनसारखे फलंदाज एकामागून एक पेव्हेलियनमध्ये परतायला सुरुवात झाली आणि तिथेच मुंबईने आपला अर्धा सामना गमावला. टीम डेव्हिडने यावेळी दमदार फटकेबाजी केली खरी, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही. डेव्हिडने २२ चेंडूंत ३१ धावांची खेळी साकारली. चेन्नईच्या गोलंदाजांनी यावेळी कमाल गोलंदाजी केली. रवींद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक ३ बळी मिळवले, तर मिचेल सँटनर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईच्या धावसंख्येला वेसण बसली आणि त्यांना १५७ धावा करता आल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5DwRxk0
No comments:
Post a Comment