Breaking

Thursday, April 6, 2023

धक्कादायक! शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?, क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला https://ift.tt/eCHN8QW

: क्षणाचा राग आणि किती टोकाचा परिणाम घडवू शकतात याचा आपण विचारही करू शकणार नाही. बुलडाण्यातील देऊळगाव येथील पती-पत्नीमध्ये घडलेल्या प्रकार याचेच उदाहरण आहे. मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर झाला व त्याने . देऊळगाव राजा येथे ही घटना घडली.शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस या कारणावरुन पतीने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली.याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देऊळगाव राजा शहरातील शिवाजी पार्क भागात राहणारा आरोपी सुनील भास्कर गीते (वय ३५ वर्षे) याने ३ एप्रिल रोजी त्याची पत्नी शिवकन्या सुनील गीते (वय २५ वर्षे) हिच्यासी सकाळी साडेदहा वाजता शाळेतून येणाऱ्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली ? या कारणावरुन वाद घातला. दरम्यान त्याने शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला होता. पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे झाले स्पष्टयाप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता. मात्र प्रतीक्षा होती शवविच्छेदन अहवालाची. दरम्यान ५ एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गीते यांनी खुनाची कबुली दिली. सुनीलला न्यायालयापुढे हजर केले गेले आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली असून, त्यास आज न्यायालयापुढे हजर केले गेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pCc5Nfn

No comments:

Post a Comment