चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच नाद करायचा नाही, असे म्हटले जाते आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले. भारतीय संघात नसला तरी तोच जुना धोनी यावेळी पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी २१ धावांची गरज होती आणि धोनी स्ट्राइकवर होता. पण त्यावेळी संदीप शर्माने दोन वाईड टाकले. त्यानंतर त्याने एक चेंडू निर्धाव काढला, पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र धोनीने षटकार वसूल केला. धोनीने त्यानंतर पुन्हा एक षटकार खेचला. त्यानंतर धोनीला एका धावेवर समाधान मानावे लागले. जडेजानाही एक धाव काढली. त्यानंतर एका चेंडूत पाच धावा हव्या होत्या, पण धोनीला यावेळी एकच धाव काढता आली आणि राजस्थानने हा सामना तीन धावांनी जिंकला.राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण ऋतुराज गायकवाड यावेळी ८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे यांनी ६८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईचा संघ सुस्थितीत आला. पण अजिंक्य ३१ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर चेन्नईचा डाव घसरला. अजिंक्य बाद झाल्या, शिवम दुबे, अंबाती रायुडू. मोईन अली हे झटपट बाद झाला. कॉनवेने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण तो ५० धावांवर बाद झाला. त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आता महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यावर होती.प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला यावेळी चांगली सुरुवात मिळाली नाही. कारण त्यांचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा दुसऱ्याच षकता ११ धावांवर बाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. पण त्यानंतर जोस बटलर आणि दवदत्त पडीक्कल यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागदारी रचली. पण यावेळी देवदत्त ३८ धावांवर बाद झाला आणि राजस्थानला दुसरा धक्का बसला. देवदत्त बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन हा फलंदाजीला आला, त्यामुळे आता संघाची धावगती वाढेल असे वाटत होते. पण ही गोष्ट होऊ शकली नाही. कारण त्याच षटकात रवींद्र जडेजाने संजूला बाद केले आणि राजस्थानला सर्वात मोठा धक्का दिला. कारण संजूला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.संजू बाद झाला तरी एका बाजूला खेळपट्टीवर जोस बटलर ठामपणे उभा होताच जोसने यावेळी अश्विनच्या साथीने संघाचे शतक धावफलकावर लावले. या दोघांची जोडी चांगली जमली होती. पण अश्विन यावेळी ३० धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण जोसने त्यानंतर आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतकानंतर जोस जास्त काळ खेळू शकला नाही. जोसने ५२ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायरने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद ३० धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच राजस्थानला १७५ धावा करता आल्या.या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकली होती आणि महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IVdypBq
No comments:
Post a Comment