Breaking

Wednesday, April 5, 2023

क्षुल्लक कारणावरू वाद, बायकोला आला भयंकर राग, डोक्यावर मुसळ मारून नवऱ्याला केले ठार https://ift.tt/PYM5tJe

: क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने संतापलेल्या बायकोने आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर मुसळाने वार करुन त्यास ठार केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात समविष्ट कोर्ला येथे मंगळवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. शंकर लचमय्या दुर्गम (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुशीला दुर्गम (३५) हिला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी शंकर दुर्गम व सुशीला दुर्गम यांच्यात पैशांवरुन वाद झाला. काही क्षणातच पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. भांडणात संतापलेल्या सुशीलाने शंकरच्या डोक्यावर मुसळाने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शंकर काही क्षणातच गतप्राण झाला. त्यानंतर शंकरचे वडील लचमय्या दुर्गम यांनी पातागुडम पोलिस मदत केंद्रात फिर्याद नोंदवली. पातागुडम येथील पोलिस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार व असरअली येथील पोलिस उपनिरीक्षक तानाजी बहिरम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आज सुशीला दुर्गम हिला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kzqIw86

No comments:

Post a Comment