सातारा : पाचगणी येथील हॉटेल अलमिनारमध्ये मुंबई येथील पर्यटक गळफास घेऊन केली. ही घटना सोमवारी घडली. गोपकुमार जी पिल्लई (वय ४४ वर्षे ) असे त्या पर्यटकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची पाचगणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घडलेल्या या घटनेमुळे हॉटेलपरिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अलमिनार हॉटेलमध्ये रुम नं ११० मध्ये आलेला ग्राहक गोपकुमारजी पिल्लई (वय ४४ वर्षे, राहणार- फ्लॅट क्रमांक ३०१, जय समृद्धी माजीवाडा लास्ट, बस स्टॉप ठाणे) याने सोमवारी दिनांक १० एप्रिल रोजीचे सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान रुममधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची हॉटेलचे मॅनेजर अल्ताफ शौकतअली शेख ( वय ४३ वर्षे, व्यवसाय हॉटेल मॅनेजर) याने याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी आरपीसी १७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ शौकतअली शेख हा सध्या पांचगणीच्या सिद्धार्थनगरात राहायला आहे. मात्र तो मूळचा मुंबईतील वाकोला मशीद परिसरात सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी आहे. गोपकुमारजी पिल्लई यांच्यासोबत त्यांचे कोण नातेवाईक, मित्रमंडळी आली होती, याबाबत कोणताही तपशील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर. के. कदम व त्यांचे सहकारी करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JWlViuR
No comments:
Post a Comment