चंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात मोहफुल सहज उपलब्ध होतात. मोहफुल म्हटलं की डोळ्यासमोर उभी होते ते मोहफुलापासून तयार केलेली दारू पण हे चित्र आता बदलू लागलंय. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मोहफुलापासून विविध खाद्य पदार्थ निर्माण करण्याचा संकल्प एका तरुणीने केला आहे. केक, चिक्की,गुलाबजाम, सरबत,जेली असे विविध पदार्थ ती बनविते. या पदार्थांना मोठी मागणी आहे. यातून आदिवासी महिलांना रोजगाराची मोठी संधी आहे. आता ती महिलांना प्रशिक्षण देत आहे. चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या चेक बल्लारपूर येथील त्या महिलेचं नाव सुश्मिता रुषी हेपट असे आहे. ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उंची वाढायला हवी, असं तीच स्वप्न त्यासाठी ती छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्हातील अतिशय दुर्गम भागातील पायावटेवरून चालत आहे. तिचा हा खडतर प्रवास बिकट आर्थिक स्थितीत दबलेल्या, खचलेल्या महिलांचा आयुष्यात आनंद पेरणारा ठरत आहे.
अशी घडली " ती "
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांची मोठी संख्या असलेलं गाव म्हणजे चेक बल्लारपूर, शेतकरी कुटुंबातील ही सुश्मिता, तिला बालपणापासून निसर्गाचे फार आकर्षण होते. विविध फुले, वृक्ष,फळं याचा तिला भारी नाद. जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत ती शिकली. त्यानंतर बामणी येथील बीआयटीत अन्नतंत्र पदविका मिळविली.याच काळात वैदर्भीय खाद्यसंस्कृती वैशिष्ट्याचा अभ्यास तिने सुरु केला. जळगाव येतील निलॉन्स संस्थेत तिने इंटर्नशीप केली.पुढे अमरावती विद्यापीठात शासकीय महाविद्यालयात केमिकल अँड फुड टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. राष्ट्रीय सेवा योजन शिबिरादरम्यान मेळघाटातल्या कोरकू समाजाशी सुश्मिताचा जवळचा संबंध आला. कुपोषणाचं प्रमाण या भागात अधिक असल्यान आदिवासी समाजासाठी काही करता येईल या विचाराने तिनं आदिवासींची पारंपरिक पाककृती शोधून काढण्याचा निश्चय केला. मोहफुल हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. गडचिरोली आणि परिसरातील जंगलात आदिवासींसाठी हा वृक्ष फार महत्वाचा.याच मोहफुलापासून आता ती पदार्थ तयार करत आहे.केक, चिक्की आणि बरंच काही....
सुश्मिताने सर्वप्रथम मोहफुलापासून लाडू तयार केले आहेत. त्यानंतर तिने चिक्की,सरबत,बोंडा,गुलाबजाम,जाम,जेली,केक पदार्थाची निर्मिती केली. बाजारात या पदार्थना मोठी मागणी वाढली आहे.आता ती देतेय प्रशिक्षण...
मोह फुलापासून तयार केलेल्या पदार्थांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. यातून बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न होत आहे. आदिवासी महिलांना आर्थिक निर्भर करण्यासाठी बचत गटातील महिलांना ती प्रशिक्षण देत आहे.गडचिरोली जिल्हातील कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेते मार्फत मोहफुल आदिवासींची शाश्वत उपाजीविका या प्रकल्पात ती कार्यरत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Wrkd3gE
No comments:
Post a Comment