Breaking

Sunday, April 9, 2023

पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केला जादूटोणा; विवाहितेची पोलिसात तक्रार, पतीसह सासू, सासऱ्यांवर गुन्हा https://ift.tt/z2qD8MX

: राहत्या घरासमोर रात्रीच्या वेळी पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केल्याची तक्रार विवाहिता उज्ज्वला पद्ममाकर जाधव (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा सारा जादूटोण्याचा प्रकार कैद झाला आहे. हे सारे पुरावे त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.यावरून पोलिसांनी सैन्यातील पतीसह सासू, सासऱ्यांवर महाराष्ट्र व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पती पद्ममाकर बळवंत जाधव, सासू कुसुम बळवंत जाधव, सासरे बळवंत विठोबा जाधव (सर्व रा. शेळकेवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवाहिता उज्ज्वला जाधव या कारंडवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा पती सैन्य दलात कार्यरत असून, तो सध्या सुटीवर आला आहे. १ एप्रिल रोजी रात्री एक वाजता पती कारंडवाडीतील घरासमोर आला. हळदी-कुंकू भरून व टाचण्या टोचून ठेवलेले नारळ, लिंबू, टाचण्या, राख, सिंदूर, काळे तीळ व पपई हे साहित्य ठेवले. अशाच प्रकारे यापूर्वीही दोन वेळा हे साहित्य घरासमोर आणून ठेवले होते. अशा प्रकारे उज्ज्वला जाधव यांच्यावर जादूटोणा केल्याने त्यांना व त्यांच्या दोन्ही मुलांना मानसिक त्रास झाला. हा प्रकार वारंवार होऊ लागल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पती, सासू सासऱ्यावरही जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके तपास करीत आहेत. उज्ज्वला जाधव यांच्या घरासमोर तसेच एका दुकानासमोर सीसीटीव्ही आहेत. या सीसीटीव्हीमध्ये हा सारा जादूटोण्याचा प्रकार कैद झाला आहे. हे सारे पुरावे त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jfkhcEV

No comments:

Post a Comment