Breaking

Friday, May 12, 2023

Akola Crime : वर्चस्वाच्या लढाईतून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू तर एक गंभीर https://ift.tt/W7hJXBY

अकोला : अकोल्यात दोघांमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेल्यानंतर तरुणांनी धक्कादायक पाऊले उचलली होती. वर्चस्वाच्या वादातून मोठा घातपात होऊन एकाची हत्या तर १ जण जखमी झाला होता. दहा महिन्यांपूर्वी विनोद वामन टोंबरेंवर (वय ३५, पंचशील नगर, खरप, अकोला) याची हल्ला करुन हत्या करण्यात आली. तर हल्ला करणारा मारेकरी सुहास वाकोडे हा देखील जखमी झाला होता. आता आरोपी सुहास वाकोडे याच्या भावावर देखील चार ते पाच लोकांनी प्राणघातक हल्ला चढविला आहे. यात एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. आकाश वाकोडे असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून गौरव मानकर असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश वाकोडे याच्या बहिणीचा आज विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर काही सामान पोहोचण्यासाठी तो मित्र गौरव मानकर याच्या बरोबर गेला होता. आज शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घरी परतीच्या प्रवासावर असताना अचानक चिखलपूर न्यू तापडिया नगर रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चारचाकी वाहनातून चार ते पाच लोक खाली उतरले अन् दोघांवर तलवारीने हल्ला चढवला. या घटनेत आकाश वाकोडे आणि गौरव मानकर हे गंभीर जखमी झाले असून यामध्ये आकाश वाकोडे याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं समजते. तर गौरव हा गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथका इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. हा प्रकार भर रस्त्यात घडल्याने स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तरीही पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. सद्यस्थितीत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मारेकरी आरोपींचा शोध सुरू आहे. आकाश वाकोडे नेमका कोण? गेल्या दहा महिन्यांपूर्वी मृतक विनोद टोंबरे आणि त्याच्या मारेकऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती, या लढाईचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं होत. सुहास वाकोडे आणि त्याच्या साथीदारांनी विनोदच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यात विनोद याचा जागीच मृत्यू झाला होता. तर मारेकरी सुहास वाकोडे हा देखील या घटनेत जखमी झाला होता. या घटनेनंतर सुहास वाकोडेसह त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सुहाससह ४ जण अटकेत असून सर्व चिखलपूरा परिसरातील आहेत. दरम्यान, आज हत्या करण्यात आलेला व्यक्ती आकाश वाकोडे हा आरोपी सुहास वाकोडे याचाच सख्खा भाऊ असून त्याची हत्या याच म्हणजेच वर्चस्वाच्या लढाईतून झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तरीही पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. सुहास वाकोडे याच्यावर सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी, अकोल्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सुहासवर एमपीडीए नुसार कारवाई केली होती. या कारवाईत त्याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. एमपीडीए अंतगर्त शिक्षा भोगून कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुहास कारागृहातून सुटला होता अन् त्याने विनोदची हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा तो कारागृहात शिक्षा भोगत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jQqTia9

No comments:

Post a Comment