Breaking

Monday, May 15, 2023

End Of Earth: पृथ्वीचा नाश कसा होणार, तज्ज्ञांकडून धडकी भरवणारी माहिती उघड https://ift.tt/8U10Pi9

मुंबई: अनेकवेळी अनेक लोकांनी जगाचा अत कसा होणार याची भविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणीच्या आधारे अनेक बातम्याही आल्या. तेव्हा लोकांनी आता जग संपणार म्हणून आपआपल्या अखेरच्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. पण, ज्या तारखेला जगाचा नाश होईल असं सांगण्यात आलं होतं, तसं काही झालंच नाही. इतकंच नाही तर अनेक कॅलेन्डर्समध्येही जगाच्या शेवटाची घोषणा करण्याच आली होती. मात्र, अद्याप तरी आपल्या जगाचा नाश झालेला नाही. पण आता खुद्द तज्ज्ञांनी पृथ्वीचा शेवट कसा होणार, हे सांगितलं आहे. तज्ज्ञांनी पृथ्वीच्या शेवटाचे तीन मार्ग सांगितले आहेत. आपल्या जगाचा अंत म्हणजे पृथ्वीवरून मानवांचा अंत होणे. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या. कधी कुणी तारीख सांगतं तर कधी कुणी प्रलय येईल असं सांगतात. पण, आता तज्ज्ञांनी सांगितले आहे की जर जगाचा अंत होणार असेल तर तो फक्त तीन कारणांमुळे होईल. तुमचा विश्वास बसणार नाही की यापैकी दोन कारणं ही मानवनिर्मित आहेत. मानवाच्या दुष्कृत्यांमुळे ते जगातून नष्ट होणार आहे. सर्वात पहिलं कारण म्हणजे उल्कापिंड. तशा तर अनेक उल्का पृथ्वीवर आदळत असतात. पण, जर एखादी विशाल आकाराची उल्का पृथ्वीवर कोसळली तर पृथ्वीचा अंत होऊ शकतो. उल्केव्यतिरिक्त जर पृथ्वीवर प्रलय येणार असले तर ते मानवामुळेच असेल. उल्लेख केलेल्या तीन कारणांपैकी दोन कारणे मानवानेच निर्माण केली आहेत. इतर ग्रहांवर राहणाऱ्या एलियनशी संपर्क साधण्याचा माणूस सतत प्रयत्न करत असतो. असे सांगितले जात आहे की हे एलियन कदाचित मैत्रिपूर्ण नसतील. ते पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि अशा प्रकारे पृथ्वीवर विद्ध्वंस होऊ शकतो. तिसरे आणि शेवटचे कारण म्हणजे रोबोट्स. मानवाने बनवलेले काही रोबोट प्राणघातक ठरु शकतात. ते फक्त मानवांवर हल्ला करतील आणि पृथ्वीचा नाश होईल. अशाप्रकारे, मानवाच्या चुकीच्या कृत्यांमुळेच पृथ्वीचा अंत होण्याची शक्यता अधिक आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lmaG7Xx

No comments:

Post a Comment