पालघर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी रुळ उभारणीच्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने होत असताना राज्यातील स्थानकांनी आकार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरातील शेवटचे बुलेट रेल्वे स्थानक विरारमध्ये असणार आहे. विरार बुलेट ट्रेन स्थानक जमिनीपासून २०.७९० मीटर उंचीवर असेल. येथे बुलेट ट्रेनला राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्ग आणि तीन राज्य मार्गांची जोडणी देण्यात आलेली आहे.रस्ते प्रवासही वेगवानजुना मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई महामार्ग जोडून राष्ट्रीय महामार्ग ४८ तयार करण्यात आला. मुंबई, पुणे, बेगळुरू, जयपूर, अहमदाबाद, सुरत या शहरांमधून हा महामार्ग जातो. विरार बुलेट स्थानकापासून अवघ्या ६ किमी अंतरावर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याचबरोबर पेल्हार रोड, चंदनसार रोड, विरार-नालासोपारा रोड यांची जोड असल्याने बुलेट ट्रेनने उतरल्यावर वेगाने रस्ते प्रवास करणे शक्य आहेमार्ग – विरार बुलेट स्थानकापासून अंतरविरार रेल्वे स्थानक – ८ किमीपेल्हार रोड – १ किमीविरार-नालासोपारा रोड – ४.५ किमीचंदनसार रोड - ९.५ किमीराष्ट्रीय महामार्ग - ६ किमीतळमजल्यावरील प्रवासी सुविधा- तिकीट विक्री केंद्र- प्रतीक्षा क्षेत्र- आरामकक्ष- सुरक्षा तपासणी- वैद्यकीय कक्ष- अत्याधुनिक सुविधागृह (बिझनेस लाऊंज)- नर्सरी- किरकोळ विक्री केंद्रपहिला मजला- चार फलाट- दुतर्फा फलाट- अप-डाऊन प्रत्येकी दोन मार्गिकातळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट, सरकते जिने आणि पायऱ्या उपलब्ध असणार आहेत.बुलेट रेल्वे स्थानक परिसर- बुलेट स्थानकाच्या दोन्ही दिशेला राखीव पादचारी क्षेत्र- बससाठी स्वतंत्र प्रवेशद्वार- रिक्षा, तीनचाकी, दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार- चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार- रिक्षा, बस आणि दुचाकीसाठी स्वतंत्र वाहनतळ- व्यावसायिक विकासासाठी राखीव क्षेत्रवलई पाडा रस्त्याचा विस्तारविरार-नालासोपारा यांना जोडणाऱ्या वलई पाडा रस्त्याचा सात मीटर रुंदीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे विरार-नालासोपारासह मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या हा रस्ता सुमारे साडेतीन मीटर रुंद आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/S7628OP
No comments:
Post a Comment