म.टा. प्रतिनिधी, : समलिंगी संबंधातून पार्टनरची हत्या करणाऱ्याला कोराडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नागपूरमधील खापरी गावात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घनश्याम गणपत सिरसाम (वय ४५ वर्ष, रा. शिवनी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम खापरी, नागपूर) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा समलैंगी संबंधांतील पार्टनर संदीप चंद्रभान गोडांगे (वय २३, रा. खापरी) याने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.घनश्याम हा या प्रकरणातील फिर्यादी नरेश दिवटुजी देहुरे (रा. वारेगाव) यांच्याकडे कामाला होता. देहुरे यांचा दुधाचा व्यवसाय असून त्यांचा खापरी गावात गायींचा गोठा आहे. या गोठ्याच्या देखभालीची जबाबदारी घनश्यामकडे होती. आरोपी संदीपसुद्धा याच गावात राहत होता. तो मिळेल ती कामे करतो.संदीप आणि घनश्याम समलिंगी असल्याचा दावा केला जात आहे. त्यांची जुनी ओळख असल्याचे कळते. बऱ्याच काळापासून त्यांच्यात समलैंगिक संबंधसुद्धा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. बुधवारी संध्याकाळी संदीप घनश्यामकडे आला. दोघेही दारू प्यायले. त्यानंतर दोघांनी समलिंगी संभोग केल्याचे कळते. यानंतर घनश्यामने संदीपला शिवीगाळ केली. यामुळे संदीप चिडला. त्यांच्यात वाद झाला.दारुच्या नशेत असलेल्या संदीपने घनश्यामच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली. यात घनश्यामचा मृत्यू झाला. यानंतर घनश्यामचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सोडून संदीपने तेथून पळ काढला. पोलिसांनी काही तासांतच संदीपला अटक केली. संदीपने खुनाची कबुली दिली व त्याने स्वत:च समलिंगी संबंधांबाबत माहिती दिल्याचे कळते. तूर्त पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KqvazoG
No comments:
Post a Comment