Breaking

Sunday, May 21, 2023

दारूच्या भट्ट्या शोधत बसतात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार; अजितदादांनी लगावला टोला https://ift.tt/cF9HzTB

बारामती : 'पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, आता , , येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सॅल्युटच करतो',अशा सुरात भर सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवैद्य दारू धंदे बंद होत नसल्याबाबत पोलीस प्रशासनाला सुनावले.बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करत असताना गावातील दारूबंद करण्याबाबत अजित पवारांकडे निवेदन दिले. भर सभेत दिलेले निवेदन वाचत पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, असा नारा देत आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो. आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सेल्युटच करतो.. असे म्हणत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी केली अजित पवारांकडे तक्रारग्रामस्थांनी दिलेले निवेदन पवारांनी भर सभेत वाचून दाखविले. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाणे यांना दारूबंदी होण्याबाबत पत्र व्यवहार केला होता मात्र त्यांनी दखल घेतली नाही, अशी थेट तक्रारच ग्रामस्थांनी पवारांकडे केली. ग्रामस्थांच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत पवारांनी पोलिसांना चांगलेच सुनावले.पुढे बोलताना पवार म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की, दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे म्हणतातच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पोलिसांच्या कारवाईत सातत्य नाही- अजित पवारबारामतीतील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार वारंवार करत असतात. त्यानुसार पोलीस जोरदार कारवाया पण करतात. मात्र त्यात सातत्य नसल्याचा फायदा घेत पुन्हा अवैद्य धंद्यावाले आपला व्यवसाय सुरू ठेवतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rFPVWvK

No comments:

Post a Comment