Breaking

Sunday, May 7, 2023

हैदराबादच्या थरारक विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा नेमकं घडलं तरी काय https://ift.tt/NX7dPJb

जयपूर : हैदराबादच्या संघाने अखेरच्या चेंडूवर षटाकार मारून विजय साकारला. करो या मनो सामन्यात त्यांनी विजय साकारला. या विजयानंतर गुणतालिकेत आता मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानच्या संघाने १० लढती खेळल्या होत्या. या १० सामन्यांमध्ये राजस्थानने पाच विजय मिळवले होते,तर पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यामुळे पाच विजयांसह त्यांच्या खात्यात १० गुण होते. त्यावेळी राजस्थानबरोबर मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि पंजाब हे तिन्ही संघ १० गुणांसह एकाच पारड्यात होते. त्यामुळे राजस्थानला हा विजय सर्वात महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकून त्यांना दोन गुण कमावता आले असते आणि त्यांचे १२ गुण झाले असते. जर राजस्थानचे १२ गुण झाले तर ते थेट दुसऱ्या स्थानावर जाऊ शकले असते.दुसरीकडे हैदराबादचा संघ हा या गुणतालिकेत तळाला होता. हैदराबादच्या संघाने ९ सामने यापूर्वी खेळले होते. या ९ सामन्यांमध्ये त्यांनी तीन सामन्यांत विजय मिळवला होता, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीन विजयांसह त्यांचे सहा गुण होते. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा होता. कारण हा सामान जर त्यांनी गमावला असता त्यांचे आव्हान संपुष्टात आले असते आणि जर त्यांनी विजय मिळवला असता तर त्यांना नवव्या स्थानावर जाण्याची संधी होती. विजयासह त्यांचे आव्हानही कायम राहणार होते. त्यामुळे या सामन्यात हैदराबाद कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. हा सामना हैदराबादच्या संघाने जिंकला. त्यामुळे त्यांना दोन गुण मिळाले. या दोन गुणांसह त्यांचे आता आठ गुण झाले आहे. आठ गुणांसह त्यांनी १० वे स्थान सोडले असून ते ९ व्या स्थानावर पोहोचले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान त्यांनी कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे.या सामन्यात अखेरच्या चेंडूवर राजस्थानचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kf0WDR1

No comments:

Post a Comment