Breaking

Thursday, May 11, 2023

काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार, चंद्रपुरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ https://ift.tt/Q3B4Npz

: मूल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यांच्यावर आज अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे. मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7VMN0Ts

No comments:

Post a Comment