Breaking

Sunday, May 7, 2023

ती प्रियकरासोबत पायरीवर बसून बोलत होती, इतक्यात ३ युवक आले आणि केले धक्कादायक कृत्य https://ift.tt/VTP3hRJ

: प्रेमाच्या त्रिकोणातून माजी प्रियकराने साथीदारांच्या मदतीने चाकूने वार करून युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कपिलनगर पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली. रोहित (वय २८ वर्षे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अनिल राकेश यादव व त्याच्या साथीदारांविरुद्ध केल्याचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ३४ वर्षीय हर्षा (बदललेले नाव) राहते. हर्षाची आधी अनिलसोबत मैत्री होती. गेल्या काही महिन्यांपासून हर्षाने अनिलसोबत संबंध तोडले. तिची रोहितसोबत मैत्री झाली. त्यामुळे अनिल संतापला. अनिलने रोहितला गाठून हर्षासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध संपुष्टात आण अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकी दिली. रोहितने अनिलच्या धमकीकडे केले दुर्लक्षरोहित धमकीकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री रोहित हा हर्षाच्या निर्माणाधीन इमारतीत गेला. हर्षा व रोहित हे पहिल्या माळ्याच्या पायरीवर बसून बोलत होते. याचवेळी तीन युवक तोंडाला दुपट्टा बांधून तेथे आले. त्यांच्या हातात चाकू बघून हर्षा ही तेथून पळाली. तिघांनी रोहितवर चाकूने सपासप वार केले व पसार झाले. हर्षाने कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमी रोहितला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हर्षाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला . हर्षाने अनिल याच्यावर संशय व्यक्त केला आहे. आरोपी अनिल राकेश यादव हा फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fPzZH4

No comments:

Post a Comment