चंद्रपूर : राज्यात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक यांचा कारच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंधीमाल फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.अधिक माहितीनुसार, चंद्रमणी डांगे (५१) असे मृतक निरीक्षकाचं नाव आहे. अपघातात डांगे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी सुमना डांगे (४८) आणि मुलगी दिया डांगे (२१) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्लीवरून दुपारी डांगे हे आपल्या परिवारासह नागपूरला जात असतांना चिंधीमाल फाट्याजवळ त्यांचं कारवरून नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करत असल्याची माहिती आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nBTNksf
No comments:
Post a Comment