Breaking

Friday, May 12, 2023

Kalyan : पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळली, अखेर इंजीनिअर पत्नीचे धक्कादायक कृत्य, पतीच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा https://ift.tt/DaGnk7x

: पतीचे बाहेरील एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. ते त्या महिलेपासून दूर होण्याची शक्यता नाही. तसेच संबंधित महिलाही मृत महिलेला लघुसंदेश पाठवून त्रास देत होती. पतीच्या या प्रकाराला कंटाळून कल्याणमध्ये एका इंजिनियर असलेल्या महिलेने गुरुवारी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.प्रज्ञा (४४) असे स्थापत्य अभियंता असलेल्या मृत महिलेचे नाव आहे. मृत प्रज्ञा यांची मुलगी रिध्दी हिच्या तक्रारीवरुन कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सचिन मोरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत रिध्दी हिने म्हटले आहे की, सचिन मोरे आणि एका महिलेचे अनैतिक संबंध आहेत, याची माहिती प्रज्ञा मोरे हिस डिसेंबर २०१९ मध्ये मिळाली होती. त्या महिलेशी संबंध ठेऊ नका, असे पत्नी प्रज्ञा सतत आपल्या पतीला सांगत होती. त्या महिलेशी संबंध ठेवणार नाही असे बोलून सचिन पुन्हा त्या महिलेच्या संपर्कात होते. त्या महिलेला आपण सोडू शकत नाही. तुला काय करायचे ते कर, तू जीव दे नाहीतर काही कर, असे पत्नी प्रज्ञाला बोलून ते पत्नी बरोबर भांडण उकरुन काढत होते. अनैतिक संबंध असलेली महिला देखील प्रज्ञा हीस मोबाईलवर संपर्क करुन चिथावणीखोर भाषा करुन तिला मानसिक त्रास देत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आई प्रज्ञा हिने उंदीर मारण्याचे औषध पिऊन राहत्या घरात आत्महत्या केली, असे तक्रारदार रिध्दी हिने म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ या प्रकरणाचा तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tNYo0cl

No comments:

Post a Comment