Breaking

Monday, May 8, 2023

रिंकू सिंग पुन्हा ठरला KKR साठी तारणहार, आंद्रे रसेलच्या चुकीनंतरही कोलकाताने सामना जिंकला https://ift.tt/fT6KzUC

कोलकाता : रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत केकेआरला थरारत विजय मिळवून दिला. त्यापूर्वी आंद्रे रसेलने ४२ धावांची धडाकेबाज खेळी साकारत संघाला विजयासमीप पोहोचवले होते. पण १९.५ व्या चेंडूवर तो धावचीत झाला आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रिंकूने चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने केकेआरपुढे १८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा कर्णधार नितिश राणाने अर्धशतक झळकावले.पंजाबच्या १८० धावांचा पाठलाग करायला केकेआरचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांची सुरुवात आश्वासक झाली नाही. कारण पाचव्या षटकात केकेआरचा गुरबाझ १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही काळ जेसन रॉय आणि कर्णधार नितिश राणा यांची दमदार भागीदारी झाली. पण रॉय ३८ धावांवर बाद झाला आणि केकेआरला दुसरा धक्का बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेला वेंकटेश अय्यर ११ धावांवर बाद झाला. केकेआरचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण तरीही राणा हा खेळपट्टीवर टिकाव धरून होता. राणाने यावेळी अर्धशतक झळकावले आणि त्यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. राणाने यावेळी ३१ चेंडूंत ५८ धावा केल्या.पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पण पंजाबच्या संघाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. पंजाबच्या संघाला यावेळी पहिल्या चार षटकांतच दोन धक्के बसले. त्यामुळे त्यांची चार षटकांत २ बाद २९ अशी अवस्था झाली होती. पण सलामीवीर शिखर धवन मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता. पंजाबला एकामागून एक धक्के बसत होते. पण तरीही धवन डगमगला नाही. धवनने यावेळी दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले आणि संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. धवनने यावेळी ४७ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. पंजाबच्या तळाच्या फलंदाजांनी कमी चेंडूंत जास्त धावा केल्या आणि त्यामुळेच पंजाबच्या संघाला दिडशे धावांच्या पुढे मजल मारता आली. हरमनप्रीत ब्रारने यावेळी ९ चेंडूंत १७ धावा केल्या तर शाहरुख खानने ८ चेंडूंत २१ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १७९ धावांची मजल मारता आली. पंजाबचा कर्णधार शिखर धवन केकेआशी एकटा लढला आणि त्यामुळेच त्यांना १८० धावांचे आव्हान ठेवता आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UCWpsXw

No comments:

Post a Comment