Breaking

Saturday, May 13, 2023

Sex racket in Pune: पुण्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलला पकडले https://ift.tt/OzpYE7R

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुण्यातील वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल्समधून चालणाऱ्या एका केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसायाचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका गुप्त माहितीवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर सापळा रचण्यात आला होता. येथे ही अभिनेत्री आणि मॉडेलला ग्राहकांचे मनोरंजन करण्यास भाग पाडले जात होते. या ग्राहकांनी अधिक पैसे दिले होते अशी माहिती वाकड पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी देवेन चव्हाण यांनी दिली.भोजपुरी अभिनेत्रीला आणि एका मॉडेलला या व्यवसायात वेगवेगळे बहाणे करून आणण्यात तिघांचा हात आहे. या तिघांनीच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी आधी या गोष्टीची खातरजमा केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी डमी ग्राहकाची नियुक्ती केली. या डमी ग्राहकांनी त्याच्या एजंट-हँडलरशी ऑनलाइन संपर्क साधला. त्यानंतर मग नंतर अभिनेत्री-मॉडेलचे फोटो शेअर केले आणि हॉटेलच्या खोल्याही बुक केल्या गेल्या. त्यानंतर डमी ग्राहकाने हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हे शाखेने तेथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान अभिनेत्री आणि मॉडेलची सुटका करण्यात आली. मात्र ही अभिनेत्री आणि मॉडेलची ओळख उघड करण्यात आली नाही. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रबीर पी. मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांनीच दोन महिलांना मोठ्या रकमेचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकवले होते. आता या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे. हे जाळे कुठपर्यंत पसरले आहे तसेच ग्लॅमर इंडस्ट्रीतील इतर महिलांचाही यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड आणि इतर आसपासच्या भागात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लोकांचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6NnlrSp

No comments:

Post a Comment