पुणे : मला राज्याच्या राजकारणात रस आहे, सुप्रिया सुळे हे राष्ट्राच्या राजकारणात राहतील, मी नाराज नाही, माझ्या बदल अशा चर्चा आणि गॉसिप करणं बंद करा यांनी थेट प्रतिक्रिया दिली.आज राष्ट्रवादी काँगेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या. अजित पवार हे दिल्ली येथे मीडियाला प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे नाराजीचा चर्चांना अजूनच हवा मिळाली. मात्र पुण्यात आल्यानंतर या सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आमची एक समिती होती. त्यावेळी दोन निर्णय घेण्यात आले होते. एक तर साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची नेमणूक करावी. तेव्हा सगळे म्हणाले होते की राजीनामा इतकाच मुद्दा आता मांडा म्हणून मी लोकशाहीचा आधार घेऊन गप्प बसलो होतो. सुप्रिया सुळे या राष्ट्राच्या राजकारणात राहतील आणि आणि मी राज्याच्या राजकारणात राहणार आहे असा निर्णय घेण्यात आला होता. माझ्यावर राज्याच्या विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली नाही असा बोलू नका. मी नाराज नाही. माझ्याबद्दल गॉसिप करू नका अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी आपण नाराज असल्याच्या बातम्यांचं खंडन केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JFcfQM7
No comments:
Post a Comment