
मियामी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा उमेदवारीच्या शर्यतीत उतरलेले नेते डोनाल्ड ट्रम्प यांना अयोग्य पद्धतीने हाताळण्याप्रकरणी कोर्टात हजर होत आपल्यावरील सर्ल आरोप फेटाळले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. गोपनीय कागदपत्रांच्या प्रकरणात ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा मियामी न्यायालयात हजर झाले. यादरम्यान त्यांनी मियामी कोर्टहाऊसमध्ये अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली.माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे गोपनीय कागदपत्रे प्रकरणासह इतर ३७ प्रकरणांमध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्वात गंभीर कायदेशीर लढाईला सामोरे जात आहेत.माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर ३७ गुन्हे दाखलमाजी राष्ट्रपतींवर ३७ गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी ३१ सरकारी गोपनीय कागदपत्रांशी संबंधित आहेत. आपल्या देशाच्या इतिहासातील हा सर्वात दुःखद दिवस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली होती.ट्रम्प दुसऱ्यांदा झाले न्यायालयात हजर न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी ट्रम्प आणि त्यांचे सहकारी वॉल्ट नौटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्धच्या खटल्यादरम्यान कोर्टात कॅमेरे किंवा कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी नव्हती. अलिकडच्या काही महिन्यांत ट्रम्प न्यायालयात हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. एप्रिलमध्ये एका पॉर्न स्टारला गप्प बसण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपावरून ते कोर्टात हजर झाले होते. त्या प्रकरणात त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले होते.कोर्ट हाउसबाहेर ट्रम्प समर्थकांची गर्दीमंगळवारच्या हजेरीदरम्यान ट्रम्प यांचे समर्थक कोर्ट हाउसबाहेर जमले होते. ते ट्रम्प यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. दरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे मियामीचे महापौर फ्रान्सिस सुआरेझ यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. बाहेर जरी ५० हजार लोकांचा जमाव आला आणि संभाव्य हिंसाचाराचा विचार केला तरी त्याचा सामना करण्यासाठी आमचे अधिकारी तयार आहेत, असे महापौर म्हणाले.ट्रम्प म्हणतात, 'मी निर्दोष'ट्रम्प सतत आपण निर्दोष आहोत, असा दावा करत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासनावर आपल्याला लक्ष्य करत असल्याचा आरोपही ते करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lh0yVTa
No comments:
Post a Comment