Breaking

Sunday, June 11, 2023

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! तुम्हीही 'या' भागात राहत असाल तर घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय https://ift.tt/7r0K1Tc

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेद्वारे आता पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा भाजपने केला आहे. मालाड येथील जानू भोयेनगरमधील रहिवाशांचा याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. या निर्णयाच्या आधारे मुंबईच्या इतर भागातील चाळींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनाही घरे मिळण्याची शक्यता आहे.शासनाच्या विधी व न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना घर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तसेच म्हाडाच्या मुख्यालयात २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीत, जुन्या चाळीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंबाबत सहानभूतीपूर्वक तसेच सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. या बैठकीनंतर हा प्रस्ताव मंत्रालयातच पडून होता. त्यासंदर्भात माहिती घेऊन भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी १० जून रोजी फडणवीस यांची भेट घेतली. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.दरम्यान, रविवारी ११ जून २०२३ रोजी जानू भोयेनगर येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण योजनेद्वारे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळणार असल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे कळविण्यात आले आहे, अशी माहिती मिश्रा यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जानू भोयेनगरमधील असंख्य रहिवाशांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. येथील झोपडीधारकांनी घरांसाठी तब्बल १२ वर्षे लढा दिला होता. मालाड तसेच मंत्रालय येथे धरणे आंदोलन केले होते, याकडे लक्ष वेधत या निर्णयाचा फायदा मुंबईमधील अनेक झोपडीधारकांना भविष्यात होणार असल्याचे मिश्रा यांनी या पत्रात नमूद केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OaRQ0Dv

No comments:

Post a Comment