Breaking

Wednesday, June 7, 2023

Odisha Train Accident: एक-दोन नव्हे, वर्षभरात ५१ हजार वेळा बिघडले रेल्वे सिग्नल; आकडे पाहून थक्क व्हाल https://ift.tt/OjASevh

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताने सर्वांनाच हादरवले आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने फेब्रुवारीमध्येच इंटरलॉकिंग यंत्रणेतील बिघाडाचा इशारा दिला होता. तशी गडबड झाल्याची घटनाही समोर आली. याबाबत अधिकाऱ्यांनी पत्र लिहून इशारा दिला होता. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये वारंवार चुका झाल्या आहेत. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑटोमॅटिक रेल्वे इंटरलॉकिंग सिग्नल सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. रेल्वेच्या इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टीम (ICSM) वर सिग्नल बिघाडाची आकडेवारी धक्कादायक आहे.असंख्य वेळा सिग्नल झाले फेलआकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ५१ हजार २३८ वेळा सिग्नल फेल झाले आहेत. एकट्या एप्रिल महिन्यात देशातील सर्व १७ झोनमधील रेल्वे विभागांवर सिग्नल बिघाडाच्या ४५०६ घटनांची नोंद झाली आहे. नव्याने बांधलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर जेथे एप्रिल महिन्यात ३७४ सिग्नल अयशस्वी झाले. दुसरीकडे, लखनौ, मुरादाबाद, दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर रेल्वे विभागाचा समावेश असलेल्या उत्तर रेल्वेमध्ये सर्वाधिक ११२७ सिग्नल बिघाड आहेत. यातील पाच झोन रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालय दर महिन्याला झोननिहाय अहवाल तयार करत असते. देशभरात असे फेल झाले सिग्नलयाबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, एका वर्षात देशभरात फेल झालेल्या सिग्नलचे आकडे पाहून तुम्हाला धक्का बसेल. मे २०२२ मध्ये ५०१६, जूनमध्ये ४७५४, जुलैमध्ये ५२०४, ऑगस्टमध्ये ४३४६, सप्टेंबरमध्ये ४५४८, ऑक्टोबरमध्ये ४३४०, नोव्हेंबरमध्ये ३९००, डिसेंबरमध्ये ३९२५, जानेवारी २०२३ मध्ये ३६०५, फेब्रुवारीमध्ये ३१८१, मार्चमध्ये ३९१४ आणि मार्चमध्ये ३९१४ सिग्नल फेल झाले. तर एप्रिलमध्ये ४५०६ वेळा सिग्नल फेल झाले. दर महिन्याला रेल्वे सिग्नल बिघाडाच्या घटना समोर येत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BLd5qZ9

No comments:

Post a Comment