दुबई: नशीबाच्या भरवशावर बसून तुम्ही कधीच यश संपादन करु शकत नाही. त्यासाठी स्वत:ला मेहनत करावी लागते. आता या व्यक्तीचंच उदाहरण घ्या. ही व्यक्ती कधी टॅक्सी चालवायचा. पण, आज तो कोट्यधीश झाला आहे. त्याने टॅक्सी चालवून इतके पैसे जमा केले की त्याने स्वतःची लिमोसिन कंपनी सुरू केली. सलीम अहमद खान असे या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती आपल्याच शेजारच्या पाकिस्तानची रहिवासी आहे. मात्र, सध्या ते दुबईमध्ये आपली ड्रीम लाईफ जगत आहेत. २००९ मध्ये तो येथे टॅक्सी चालक म्हणून आला होता. आता तो खूप श्रीमंत झाला आहे.खलीजा टाइम्सच्या रिपोर्टनुसार, खानने २०१३ पर्यंत टॅक्सी चालवली. त्याने उबरसाठी काम केले आणि २०१९ पर्यंत येथे काम करून पैसे वाचवले. ८५० चालकांसह त्याने स्वत:ची फ्लीट कंपनी सुरू केली आहे. त्याची सेवा संपूर्ण UAE मध्ये पुरवली जाते. कंपनीची सुरुवात २० टॅक्सींनी केली होती. 'मी २०१३ च्या मध्यापर्यंत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. यानंतर लक्झरी लिमोझिन टॅक्सी सेवेत प्रवेश केला आणि २०१९ पर्यंत ड्रायव्हर म्हणून काम केले', असं त्यांनी सांगितलं.खान करोडोंचा व्यवसाय चालवतातखान हे मूळचे पाकिस्तानच्या लाहोरचे आहेत. अवघ्या चार वर्षांत ते कोट्यधीश झाले आहेत. २००९ मध्ये जेव्हा ते दुबईला आला तेव्हा ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. हे काम करत असताना त्यांना महिन्याला ५,००० दिरहम म्हणजेच सुमारे १,१२,२६७ रुपये मिळत असत. आजच्या काळात त्यांचा ५ मिलियन दिरहम म्हणजेच सुमारे ११ कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. करोना विषाणूची साथ सुरू होण्यापूर्वीचे वर्ष खान यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे होते. या काळात त्यांना भरपूर यश मिळाले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. खान हे कधी १२ तास तर कधी त्याहूनही जास्त काम करायचे. २०१३ मध्ये त्यांनी स्वतःची लिमोझिन खरेदी केली. ते जे काही पैसे कमवत असत, ते आपल्या व्यवसायात गुंतवायचे. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आपली कंपनी किंग रायडर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस सुरू केली. त्यांच्याकडे ८५० कर्मचारी आहेत. यासोबतच ते आणखी एक लक्झरी ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू करत आहेत. २० वाहनांची ऑर्डर दिली आहे आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gfbQ68Z
No comments:
Post a Comment