Breaking

Sunday, June 11, 2023

हे माझ्या समजण्यापलीकडचे, सचिनने WTC फायनलमधील पराभवानंतर घेतला टीम इंडियाचा क्लास https://ift.tt/iosSEHM

नवी दिल्ली: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनुभवी रविचंद्रन अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. अश्विनसारख्या क्षमतेच्या फिरकीपटूला प्रभावी होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची आवश्यक भासत नाही. WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अश्विनला संघात वगळण्याच्या निर्णयाचा बचाव केला. पावसाळी स्थितीमुळे आपल्याला चौथ्या विशेषज्ञ वेगवान गोलंदाजाची निवड करणे भाग पडले असे द्रविड म्हणाला.सचिनने रविवारी ट्विट केले. तो म्हणतो, 'भारताला सामन्यात टिकून राहण्यासाठी पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी करायला हवी होती, पण ते करू शकले नाहीत. भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते पण अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याचा निर्णय मी पचवू शकत नाही. सध्याच्या घडीला तो जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.अश्विनच्या क्षमतेचा गोलंदाज वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या परिस्थितीत वापरता येत नाही आणि तेही ऑस्ट्रेलिया संघात डावखुरे फलंदाज असताना या युक्तिवादाने तेंडुलकर आश्चर्यचकित झाला. भारताचा दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभव झालासचिन म्हणाला, 'मी सामन्यापूर्वी सांगितले होते की, एक कुशल फिरकी गोलंदाज खेळपट्टीवर सेट झाल्यावर त्याला इतर कशाची मदत लागत नाही. तो वारा, खेळपट्टीची उसळी आणि आपल्यातील वैविध्यतेचा वापर करतो. पहिल्या आठमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच डावखुरे फलंदाज होते हे विसरता कामा नये. डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्रातील दोन वर्षांच्या चक्रात अश्विनने १३ कसोटी सामन्यांमध्ये ६१ बळी घेतले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने ४४४ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ४६९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांचा पहिला डाव अवघ्या २९६ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले. या सामन्यात कांगारू संघाने ८ बाद २७० धावा करून डाव घोषित केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावांसह एकूण ४४३ धावांची आघाडी मिळाली. अशा स्थितीत टीम इंडियाला विजयासाठी ४४४ धावा करायच्या होत्या, पण खेळाच्या पाचव्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी भारत २३४ धावा करून ऑलआऊट झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jpIsNXh

No comments:

Post a Comment