म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली आहे. २०२१ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ५३१ लाचखोरांची धरपकड करण्यात आली होती. सर्वाधिक १९२ लाचखोर नाशिकमध्ये अटक करण्यात आले असून, नाशिकने या वेळी पुणे विभागाला मागे टाकले आहे.लाचखोरीची आकडेवारीवर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३(जून)सापळा ८७५ ८९१ ८६१ ६३० ७६४ ७२८ ४३९बेहिशेबी मालमत्ता २२ २२ १९ १२ ०७ १२ ०५भ्रष्टाचार २८ २३ ०५ २१ ०२ ०९ ०१विभागानुसार सांख्यिकीविभाग गुन्हे आरोपीनाशिक ९२ १३४औरंगाबाद ७५ १०२पुणे ७५ १०७ठाणे ५५ ७८अमरावती ४५ ६४नागपूर ४४ ६६नांदेड ३४ ३९मुंबई १९ २२लाचखोरीत अडकलेली पहिली पाच खातीखाती प्रकरणे आरोपी रक्कममहसूल १०७ १४७ १८,६८,०४०पोलिस ७९ १०९ २६,१८,५००पंचायत समिती ४५ ५९ ८,०१,३००विद्युत कंपनी २२ ६६ १०,३७,३००महापालिका २२ ३२ २३,१८,८००महिन्यानुसार कारवाईमहिना सापळा आरोपीजानेवारी - ५९ ८०फेब्रुवारी - ७५ १११मार्च- ८८ १२४एप्रिल - ७० १००मे - ६९ १००जून - ७८ ९७पंधरा लाचखोरांची दोषसिद्धीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १५ लाखाखोरांची दोषसिद्धी करण्यास यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक दोषसिद्धी झालेले तीन लाचखोर हे महसूल विभागातील असून, पोलिस, जिल्हा परिषद, वन विभाग, नगरविकास, आरोग्य, शिक्षण, विद्युत, परिवहन या विभागांतील प्रत्येकी एका लाचखोराचा समावेश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ybVZAk3
No comments:
Post a Comment