Breaking

Thursday, July 13, 2023

लोणंद येथे भीषण अपघात, टँकरच्या धडकेत एक जागीच ठार, पाहणाऱ्यांच्या अंगाचा उडाला थरकाप https://ift.tt/bcFwzEB

: फलटण तालुक्यातील खराडवाडीजवळ टँकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. ही धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय ५५, रा. साखरवाडी, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, डोक्यावरून चाक गेल्याने चेंदामेंदा झाला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फलटण तालुक्यातील साखरवाडी - बडेखान रस्त्यावर आज गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच - पाच वाजण्याच्या सुमारास खराडवाडीजवळ टँकरने (एमएच १६ क्यू ७१६५) जोराच्या दिलेल्या धडकेत साखरवाडी येथील सुरेंद्र किसनराव भोसले (वय ५५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने पूर्ण चेंदामेंदा झाला होता, असे उत्तम दर्शनी दिसत होते. या अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती लोणंद पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिस दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अरुण विठ्ठल नलवडे (रा. जिंती, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नलवडे यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीस तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4zw5WjB

No comments:

Post a Comment