Breaking

Monday, July 10, 2023

महरषटर कगरसमधय मठ फरबदल? दललत आज हय वहलटज बठक नतयच उपसथत https://ift.tt/v7ys6Zj

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज, मंगळवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीस महाराष्ट्र काँग्रेसच्या २०-२५ प्रमुख नेत्यांसह पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीत आक्रमक भाजपपासून आपल्या आमदारांना 'सांभाळून' ठेवणे, तसेच लोकसभा निवडणुकीसह विरोधी पक्षनेतेपदाबाबत आणि प्रदेशाध्यक्षपदाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्व राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहे. आक्रमक भाजपपासून आपल्या आमदारांना 'सांभाळून' ठेवणे, विधानसभेतील संभाव्य पक्षनेत्याच्या नावाची निश्चिती व आगामी पावसाळी अधिवेशनात पक्षाची रणनीती आदी मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे गट राज्यात भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या दोन्ही पक्षांच्या बहुतांश आमदारांनी पारडे बदलल्यावर काँग्रेसची राज्यातील भूमिका मध्यवर्ती विरोधी पक्षाची झाली आहे. मुख्य म्हणजे काँग्रेस हा राज्यातील सध्याचा एकमेव विरोधी पक्ष आहे, ज्याची गळचेपी झालेली नाही किंवा त्याला अद्याप गळतीही लागलेली नाही. या स्थितीत भाजपच्या आक्रमकतेला तोंड देण्याची रणनीती ठरवणे हा या बैठकीचा प्रमुख अजेंडा असेल, असे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार मिलिंद देवरा आदी नेत्यांचा सहभाग अपेक्षित आहे.दरम्यान, खर्गे आणि राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. भाजपने आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे मासे गळाला लावल्याने काँग्रेस आमदारांबाबतही धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे या परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदारही राज्यातील भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असून, तेही आगामी काळात आघाडीत साहभागी होऊ शकतात, असा दावा भाजपच्या नेत्यांनी याआधीच केला आहे. काँग्रेसचे अनेक नेते प्रदेशाध्यक्षांच्या कामगिरीवर नाखूष असल्याचाही दावा या भाजप नेत्याने केला होता.अहवाल सादर होणारकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यनिहाय पक्षाच्या कामकाजाचा काढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही बैठकींचा एक अहवाल आजच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे कळते. त्याचबरोबर मुंबईबाबत विशेष अहवालही सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oJWXi1x

No comments:

Post a Comment