मुंबई: एका फ्लाइटमध्ये अचानक विचित्र परिस्थिती उद्भवली आणि १९ प्रवाशांना टेकऑफपूर्वी विमानातून खाली उतरावे लागले. विमानाचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे काही प्रवाशांना उतरावे लागेल, असे वैमानिकाकडून सांगण्यात आले. हे प्रकरण इझीजेट फ्लाइटचे आहे जे लेन्झारोटेहून लिव्हरपूलला जात होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एका प्रवाशाने रेकॉर्ड केला आहे.इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्याचा निर्णय हा वैमानिकाच्या सांगण्यावरून घेण्यात आला होता. व्हिडिओमध्ये विमानात अनेक प्रवासी आहेत, त्यावेळी पायलटचा आवाज येतो, तो सांगतो की, येथे आल्याबद्दल सर्वांचे आभार. प्रवाशी जास्त झाले आहेत, त्यामुळे विमान जरा जड झालं आहे. वाऱ्याची परिस्थिती, हवामान आणि सुरक्षितता प्राधान्यांमुळे हे उड्डाण होऊ शकत नाही. तुमच्यापैकी २० प्रवासी लिव्हरपूलला न जाण्याचा पर्याय निवडू शकतात. ५ जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पायलटने काही प्रवाशांना स्वतःच्या इच्छेने विमानातून उतरण्याचा पर्याय निवडण्यास सांगितलं. पायलटच्या आवाहनानंतर १९ प्रवासी त्यांच्या स्वेच्छेने विमानातून खाली उतरले.या संपूर्ण घटनेत विमानाला सुमारे २ तास उशीर झाला. विमान रात्री ९.४५ वाजता उड्डाण करणार होते, परंतु त्याने ११.३० वाजता उड्डाण केले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांना विमान कंपनीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले आहे. तर, EasyJet ने प्रवाशांना ५०० युरो पर्यंत दिल्याचं सांगितले. प्रवाशांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. विमानात निर्धारित वजनापेक्षा अधिक वजन प्रतिबंधीत आहे, त्यामुळे विमान कंपन्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि परिस्थितीनुसार असे निर्णय घेत असतात, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kDRJHaN
No comments:
Post a Comment