मुंबई : व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला बंदुकीने धमकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचा मुलगा राज सुर्वे याचा पोलिसांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना बोरिवली येथील न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.व्यावसायिक राजकुमार सिंग यांचे त्यांच्या गोरेगाव येथील कार्यालयात १० ते १५ जण घुसले आणि त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयात नेण्यात आले. पोलीस मागावर असल्याचे कळताच येथून जवळच असलेल्या एका खोलीमध्ये नेऊन त्यांना धमकावण्यात आले. मनोज मिश्रा या व्यक्तीसोबत असलेला करार रद्द करण्यासाठी राज सुर्वेने दबाव टाकल्याचा आरोप राजकुमार यांनी केल्यानंतर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करून मुंबईबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज मिश्रा, चेतन सिंग आणि विपुल सिंग यांना गुरुवारी अटक केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले, १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.राज सुर्वे आणि या गुन्ह्यातील इतर आरोपी अद्याप गायब आहेत. प्रकाश सुर्वे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने पोलीस दलामध्येही याप्रकरणावर अधिक कुणी वाच्यता करत नसल्याचे चित्र आहे. इतर आरोपींचे शोध सुरू आहेत, इतकेच पोलिसांकडून सांगितले जात आहे. बिहारमधून आलेल्या तीन आरोपींची राहण्याची व्यवस्था कुणी आणि कुठे करून देण्यात आली? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.बंदूक आणि फुटेज ताब्यात घेण्याची मागणीधमकावण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक आणि प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज त्वरित ताब्यात घ्यावेत अशी मागणी तक्रारदाराच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्याचबरोबर ज्या स्टॅम्प पेपरवर राजकुमार यांची जबरदस्तीने सही घेतली तो देखील जप्त करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CflAwnT
No comments:
Post a Comment