चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदाराच्या गटासह सत्ताधाऱ्याकडे जात सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील होत आहेत. खुद्द हे भाजपच्या बाजूने आहेत असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी केले आहे. तसेच राज ठाकरे हे भाजपबरोबर जातील का अशीही चर्चा सुरू आहे. या सर्वांचे उत्तर भाजप नेते आणि राज्याचे वन मंत्री यांनी दिले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भारतीय जनता पार्टी सोबतच्या युतीसंदर्भात कुठलीही चर्चा नाही. आमच्या कोअर टीममध्ये असा कुठलाही प्रस्ताव आला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगतरित्या राज ठाकरे यांच्या सोबत भारतीय जनता पक्षासोबत अलायन्स करण्यासंदर्भात चर्चा केली असेल तर या संदर्भात मला काहीच माहीत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आहे. या युतीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा आमचा धृढ संकल्प आहे, असे सांगत मुनगंटीवार यांनी इतर कोणत्याही शक्यतांवर भाष्य करणं टाळलं. मी आयुष्यात कधीही व्यक्तिगत पवार साहेबांना भेटलो नाही- मुनगंटीवारशरद पवार यांच्यासंदर्भात देखील मंत्री मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे हे अनेक वर्ष पवारांचे हितचिंतक होते. शिष्य होते व भक्तही होते. त्यामुळे त्यांना पवार साहेबांबद्दल अधिकची माहिती आहे. पवार साहेब भाजपाच्या बाजूने आहेत. याबद्दलचे भाष्य राज ठाकरे किंवा पवार साहेब हेच करू शकतील. कारण पवार साहेबांचा माझा कधीही संबंध आला नाही. मी त्यांना आयुष्यात कधीच भेटलो नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/P7chovN
No comments:
Post a Comment