Breaking

Tuesday, August 22, 2023

पुण्यात ३८ लाखांच्या चोरीप्रकरणात आरोपीला अटक; तपासातून धक्कादायक माहिती समोर https://ift.tt/yPqU5an

म. टा. प्रतिनिधी, पुणे: जुगारासाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २७ लाख ५० हजार रुपयांचे ५५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.मनीष जीवनलाल राय (वय २९, रा. कोहिनुर प्लॅनेट, सांगवी रस्ता. मूळ रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. औंध भागातील सांगवी रस्त्यावर राहणारे त्र्यंबकराव तुळशीराम पाटील यांच्या बंगल्यात आरोपी स्वयंपाकी म्हणून नोकरी करीत होता. त्याने ११ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. त्यात पोलिसांचा मनीष राय याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सखोल तपासात रायला मोबाइलवर ऑनलाइन तीन पत्ती जुगाराचा नाद असल्याचे समोर आले. त्याने पैसे हरल्याने चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ११ लाख रुपये ऑनलाइन खेळात हरल्याचे सांगितले.'बँक स्टेटमेंट'वरून आला संशय:मनीष राय गेल्या १४ महिन्यांपासून तक्रारदार यांच्याकडेच नोकरी करीत होता. त्यामुळे त्याला घराची माहिती होती. पण, त्याने बंगला बंद केल्यानंतर घरफोडी केली होती. त्यामुळे प्रथम त्याच्यावर संशय नव्हता. मात्र, त्याचे बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर संशय बळावला आणि तक्रारदारांचा स्वयंपाकीच (आचारी) घरफोडी करणारा निघाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4Wg23oV

No comments:

Post a Comment