त्रिनिदाद : भारतानं वेस्ट इंडीज विरुद्धची कसोटी मालिका आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला होता. पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेची विजयी सुरुवात करण्याची संधी टीम इंडियानं गमावली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडीजला १४९ धावांवर रोखलं होतं. मात्र, टीम इंडियाला २० ओव्हरमध्ये १४५ धावा करता आल्या.
आयपीएलचे हिरो परदेशात झिरो?
टीम इंडियानं १४९ धावांचा पाठलाग करताना १५ ओव्हर्समध्ये ४ विकेटवर ११३ धावा केल्या होत्या. तिथून पुढे संघाला ५ ओव्हर्समध्ये ३७ धावा करायच्या होत्या. मात्र, नेमक्या त्याचवेळी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे हिरो झिरो ठरले. लागोपाठ विकेट गेल्यानं टीम इंडियाला मॅच गमवावी लागली. १६ व्या ओव्हरमध्ये टीम इंडियानं २ विकेट गमावल्या. त्यानंतर टीम इंडियाला कमबॅक करता आलं नाही. २० ओव्हरमध्ये ९ विकेटवर १४५ धावांपर्यंत भारतानं मजल मारली. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मानं केल्या. त्यानं ३९ धावा केल्या. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं २१ बॉलमध्ये २१ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं १९ बॉलमध्ये १९, संजू सॅमसननं ११ बॉलमध्ये ११ धावा केल्या होत्या. इशान किशननं ६ तर शुभमन गिलनं ३ धावा केल्या. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.ऐतिहासिक सामन्यात पराभव
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कालचा सामना भारतासाठी ऐतिहासिक होता. भारताचा तो २०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. यापूर्वी पाकिस्ताननं २०० मॅचेस खेळल्या आहेत.दरम्यान, वेस्ट इंडीजचा कप्तान रोवमॅन पॉवेल यानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजच्या १४.१ ओव्हरपर्यंत ९६ धावा झाल्या होत्या. त्यानंतर पॉवेलनं तडाखेबंद खेळी करत ३२ बॉलमध्ये ४८ धावा केल्या. निकोलस पूरननं ४१ धावा केल्या.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TcjFDPa
No comments:
Post a Comment