Breaking

Sunday, August 13, 2023

Mumbai Crime: मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय? https://ift.tt/cWM5tTu

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात असून येथे दररोज किमान एक डझन सायबरचे गुन्हे दाखल होत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईमध्ये सायबरचे २,५१६ गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.मुंबईसह देशभरातील गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. मुंबईत रस्त्यावरील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून या गुन्ह्यांची जागा आर्थिक आणि सायबर गुन्ह्यानी घेतली आहे. ऑनलाइन व्यवहाराच्या पर्यायाचा वाढता वापर आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागारिकांमघ्ये असलेले अज्ञान ही सायबर गुन्हेगारी वाढण्याची मुख्य कारणे आहेत. चालू वर्षात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अडीच हजारांपेक्षा अधिक सायबर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूकीचे आणि त्यातही क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे.उकल केवळ १३ टक्केसायबर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अद्यापही म्हणावे तितके यश येत नसल्याचे गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. सात महिन्यांमध्ये दाखल झालेल्या २,५१६ गुन्ह्यांपैकी केवळ १३ टक्के म्हणजेच ३२३ गुन्हे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. मुंबई पोलिस दलामध्ये सायबर पोलिस ठाण्यांची संख्या एकवरून पाच वाढविण्यात आली. प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर गुन्हे दाखल आणि उघडकीस आणले जात आहेत. मात्र उकल होण्याचे प्रमाण वाढत नसल्याने आता तांत्रिक मदतीसाठी पाच विभागांमध्ये प्रत्येकी एक सायबर लॅब सुरू करण्यात आली आहे.गुन्हे संख्या उकलफिशिंग ३४ ०६पोर्नोग्राफी १० ०७अश्लील पोस्ट १७३ ७४मॉर्फिंग १०७ ३०क्रेडिट कार्ड ६९० ४१हॅकिंग २० ०२फसवणूक १३२५ १३१डेटा चोरी १५ ०३सेक्सटोर्शन ३८ ०४जातीय पोस्ट ०३ ०१इतर १०१ २४आर्थिक फसवणुकीत येणारे गुन्हेगुन्हे संख्या उकलकस्टम/ गिफ्ट ४२ ०१ऑनलाइन खरेदी ८१ ०५नोकरी २५३ २३इन्शुरन्स १४ ०२प्रवेश फसवणूक ०१ ००खोटे संकेतस्थळ ६६ ०२गुंतवणूक फसवणूक ५० ०५विवाहसंबधी संकेस्थळ ०४ ००क्रिप्टो करन्सी २७ ०१कर्ज ३८ ०९इतर ७४९ ८३सायबर गुन्हे वाढीची कारणे- इंटरनेटचा वाढता वापर- बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाइन- इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारबाबत अपुरी माहिती- समाजमाध्यमांचा वाढता वापर- समाजमाध्यमावर वावरताना निष्काळजीपणा- लहान मुलांकडून होणारा मोबाइलचा वापर


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HhYQirg

No comments:

Post a Comment