मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणात आरोपी चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जबाब आणि तांत्रिक पुरावे यांची सांगड घालताना रेल्वे पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मात्र, चेतन प्रश्नांना योग्य उतरे देत नसल्याने त्याला बोलते करण्यासह १० मुद्द्यांची उकल करण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांपुढे आहे. चेतनला जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये नेऊन घटनेचे नाट्यरूपांतर करण्यात आले. त्यातून तांत्रिक पुरावे मिळाल्याचे रेल्वे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.हे आहेत १० मुद्दे- हा गुन्हा अत्यंत संवेदनशील व निर्घृण स्वरूपाचा असल्याने उपलब्ध पुरावे व त्या अनुषंगाने आरोपीकडे चौकशी करून पुराव्याची संगती लावणे.- सर्वप्रथम टिकाराम मीना, त्यानंतर बी-४मधील प्रवासी अब्दुल कादर, बी-२मधील सय्यद आणि बी-६मधील असगर अली या प्रवाशांना मारले. या सर्व डब्यांतील प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. जबाबाची आणि आरोपीने दिलेल्या माहितीची खातरजमा करणे.- गाडीतील अनेक साक्षीदारांनी घटनेचे व्हिडिओ काढले असून, ते ताब्यात घेण्यात येत आहेत. त्यानुसार अधिक चौकशी करण्यात येईल.- एक्स्प्रेसमधील काही डब्यांतील सीसीटीव्ही फूटेज मिळवण्यात आले आहे. व्हिडिओतील साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू असून, अधिक तपास करणे.- रेल्वे प्रशासनाकडून गाडीचे आरक्षण तक्ते प्राप्त करण्यात आले आहेत. त्यातील संपर्क न झालेल्या प्रवाशांना मोबाइलवर संपर्क साधून आणखी तपास करणे.- सीसीटीव्ही फूटेज व साक्षीदार यांनी सादर केलेले व्हिडीओंचे तांत्रिक विश्लेषण करून पुरावे प्राप्त करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आरोपीकडे अधिक तपास करणे.- गोळीबारच्या घटनेनंतर आरोपीने मोबाइलचा वापर केला असून, त्याबाबत तपास करणे.- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे अन्य बाबींची पूर्तता करणे.- आरोपीने मूळ गाव मथुरा, हाथरसमध्ये; तसेच गुजरात, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे काम केले असून, त्या ठिकाणांहून माहिती गोळा करणे.- चेतन अत्यंत त्रोटक माहिती देत आहे. तपासादरम्यान जबाब, उपलब्ध पुरावे यानुसार तपास करणे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/n3pWM8e
No comments:
Post a Comment