मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गाचा विस्तार करताना आता वर्सोवा ते दहिसर किनारा मार्ग प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मार्गातील सहा टप्प्यांतील बांधकामांसाठी निविदा जारी केली आहे. या मार्गासाठी १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. साधारण २२ किलोमीटर लांबीच्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गामुळे प्रवास वेगवान होणार असल्याची आशा पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.सध्या मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम सुरू असून, ते ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबरपासून एक टप्पा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. हा सागरी किनारा मार्ग वांद्रे ते वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. याबरोबरच महापालिकेने दहिसर ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामांसाठीही एल अँण्ड टी कंपनीची निवड केली आहे. साधारण पाच किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम चार वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून सिग्नलविरहीत १० मिनिटात प्रवास होणार आहे.या सर्व मार्गांना नव्याने होणाऱ्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाची जोड मिळणार आहे. हा मार्ग काही पट्ट्यात दुहेरी उन्नत मार्ग असेल, जो सी लिंकप्रमाणे केबल स्टेड पुलाप्रमाणे बनवला जाईल, तर काही पट्ट्यात तो खाडीखालून जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी ११ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. या प्रकल्पाच्या कामाला येत्या नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याचा मानस आहे.सहा टप्प्यांतील कामांसाठी निविदापहिला टप्पा : वर्सोवा ते बांगूरनगर (खर्च दोन हजार ५९३ कोटी)दुसरा टप्पा : बांगूरनगर ते माइंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणी (खर्च दोन हजार ९१० कोटी)तिसरा टप्पा : माइंड स्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडील बोगदा (खर्च दोन हजार ९११ कोटी)चौथा टप्पा : चारकोप ते माइंड स्पेस मालाड दक्षिणेकडील बोगदा (खर्च दोन हजार ९१० कोटी)पाचवा टप्पा : चारकोप ते गोराई (खर्च दोन हजार ९९० कोटी)सहावा टप्पा : गोराई ते दहिसर (खर्च दोन हजार ६१२ कोटी)‘मरिन ड्राइव्ह-वरळी’चा पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंतसध्या काम सुरू असलेल्या मरिन ड्राइव्ह-वरळी सागरी किनारा मार्ग प्रकल्पात मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला हा दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत काम होत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२३पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mA7rPef
No comments:
Post a Comment