कोलंबो : भारत आणि श्रीलंकेचा हा सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्याची उत्सुकता एवढी वाढली होती की, कोणता संघ सामना जिंकेल हे कोणालाही सांगता येत नव्हते. पण या सामन्यात एक गोष्ट अशी घडली की तिथून ही लढत भारताच्या बाजूने झुकली. या सामन्यात भारताच्या विजयाचा एक टर्निंग पॉइंट ठरला. भारताच्या आव्हानाचा सामना करताना श्रीलंकेची ६ बाद ९९ अशी अवस्था झाली होती. मात्र, त्यानंतर धनंजय डिसिल्वा आणि दुनित वेलालगे यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे आता श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. भारताला विकेट मिळत नाही हे पाहिल्यावर रोहित शर्माने हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताच्या मदतीला धावून आला तो अनुभवी रवींद्र जडेजा. ही गोष्ट घडली ती ३८ व्या षटकात. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भारतासाठी मोठी गोष्ट घडली. अखेरीस रवींद्र जडेजाने ही जोडी फोडण्यात यश मिळवले. जडेजाने डिसिल्वाला बाद केले. डिसिल्वाने ६६ चेंडूंत पाच चौकारांसह ४१ धावांची खेळी केली. भारतासाठी ही विकेट सर्वात महत्वाची ठरली. कारण या दोघांनी मिळून सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवायला सुरुवात केली होती. पण जेव्हा धनंजयला जडेजाने बाद केले तोच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि तिथून हा सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. त्यानंतर वेलालगेने झुंज दिली. पण तो त्यानंतर एकाकी पडला आणि त्यामुळे भारताला हा सामना जिंकता आला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीकडून गोलंदाजांना सुरुवातीपासूनच चांगली मदत मिळत होती. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात केली. धावांचे अर्धशतक फलक लावण्यासाठी या जोडीने ९.१ षटके घेतली. रोहित-गिलने ११.१ षटकांत ८० धावांची सलामी दिली. मात्र, गिल, विराट कोहली, रोहित शर्मा एकापाठोपाठ बाद झाले. त्यामुळे बिनबाद ८० वरून भारताची ३ बाद ९१ अशी स्थिती झाली. रोहित शर्माने ४८ चेंडूंत सात चौकार व दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धचा शतकवीर कोहली मात्र तीन धावांवर बाद झाला. लोकेश राहुल आणि ईशान किशनने ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी रचून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जोडी फुटली आणि भारताचा डाव गडगडला. भारताची ४ बाद १७० वरून ९ बाद १८६ अशी स्थिती झाली. अवघ्या १६ धावांत भारताने पाच फलंदाज गमावले. अष्टपैलू अक्षर पटेलने भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज धनंजय डिसिल्वाने १० षटकांत केवळ २८ धावा दिल्या. मात्र, त्याला विकेट मिळाली नाही. मात्र, पार्ट-टाइम गोलंदाज असलंकाने भारतीय फलंदाजांना जेरीस आणले. त्याने नऊ षटकांत १८ धावांत चार विकेट घेतल्या, तर वेलालगेने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवले. पाकिस्तानविरुद्ध भारताने ३५६ धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र, श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CuG6jNE
No comments:
Post a Comment