वृत्तसंस्था, तिरुपती : भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या आदित्य एल वन यानाचे आज, शनिवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे असून, यान त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील,’ अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे संचालक एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी येथे सांगितले.सोमनाथ यांनी तिरुपती जिल्ह्यातील चेंगल्लम्मा परमेश्वरी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आदित्य एल वनची उलटगणती आजपासून (शुक्रवार) सुरू झाली. शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण केले जाईल. सूर्याचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे,’ असे सोमनाथ यांनी सांगितले.चांद्रयान-४बाबत अद्याप काहीही ठरविण्यात आलेले नाही. आदित्य एल वननंतरची आपली पुढील अवकाश मोहीम गगनयान आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गगनयानाचे प्रक्षेपण केले जाईल. -एस. सोमनाथ, संचालक, इस्रो२३ तास ४० मिनिटे‘आदित्य एल वन’च्या उलटगणतीच कालावधीस. ११.५०यानाच्या प्रक्षेपणाची वेळकुठे पाहता येईल थेट प्रक्षेपण?‘इस्रो’ची वेबसाइट https://isro.gov.in‘इस्रो’चे फेसबुक पेज https://facebook.com/ISRO‘इस्रो’चे यूट्यूब चॅनेल https://youtube.com/watch?v=_IcgGYZTXQwडीडी नॅशनलवर सकाळी ११.२०पासून‘इंडिया’ आघाडीकडून ‘इस्रो’च्या अभिनंदनाचा ठरावमुंबई : ‘चांद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभिनंदनाचा ठराव शुक्रवारी मंजूर केला. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीची शुक्रवारी सांगता झाली. ‘सर्वांसाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन आम्ही इंडिया आघाडीतील पक्ष करतो. इस्रोच्या क्षमता स्थापित करणे आणि त्या वाढविणे यासाठी सहा दशकांचा कालावधी लागला,’ असे या ठरावात म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WiRxrCQ
No comments:
Post a Comment