विजय महालेकोट्टायम: केरळच्या लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस्ती समुदायाशी नाते जोडण्यासाठी भाजपने नवे अभियान सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह डाव्या आघाडीशी सामना करीत मतटक्का वाढविण्यासाठी भाजपचा हा प्रयोग आहे. ख्रिस्ती समुदायाला सोबत आणण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या उपक्रमाला ‘स्नेह यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. येत्या ‘इस्टर’पासून त्याची सुरुवात केली जात आहे. ख्रिस्ती धर्मियांच्या घरी जाऊन भेट देतानाच, भाजपच्या विविध उपक्रम आणि संकल्पनांची माहिती दिली जाणार आहे. अशा अभियानामुळे राज्यातील जनाधार वाढविण्याचा भाजपचा मनोदय आहे. पक्षाकडून पदयात्रा देखील काढली जाणार आहे. ख्रिस्ती धर्मियांना जोडण्याचा भाजपचा हा काही पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी माजी संरक्षण मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अॅन्टोनी यांचे पुत्र अनिल अॅन्टोनी यांना भाजपने पक्षात घेतले आहे. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात ख्रिस्ती समाजातील आठ नेत्यांशी भेटून चर्चा केली. यात बहुतांश चर्चचे पाद्री होते.भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ख्रिस्त नागरिकांच्या घरी २० ते ३० डिसेंबर दरम्यान भेट देणार आहेत. स्नेह यात्रेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मियांना भाजपशी जोडले जाणार आहे, असे भाजप सरचिटणीस एम. टी. रमेश यांनी सांगितले. केरळमध्ये सर्वाधिक ५४ टक्के हिंदू, मुस्लिम २६ टक्के, तर १८ टक्के ख्रिस्ती आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड येथून निवडणूक लढवत यश मिळविले होते. राज्यातील लोकसभेच्या २० पैकी सर्वाधिक १५ जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. उर्वरित तीन जागा डाव्या आघाडीकडे गेल्या होत्या. काँग्रेसच्या यशात ख्रिस्ती धर्मियांचा वाटा मोलाचा ठरला होता. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये ५.३७ टक्क्यांची वाढ झाली होती. याच ख्रिस्ती मतांना आपल्याकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. केरळमधील बदलता मतटक्का (लोकसभा) पक्ष------------२०१४-----२०१९ (टक्केवारी) काँग्रेस----------४२.११----४७.४८ भाजप----------१२.७८-----१५.६४डावी आघाडी----३६.२९-----३३.३७
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/POAeRaU
No comments:
Post a Comment