Breaking

Sunday, January 28, 2024

Bigg Boss 17 Winner: बिग बॉस १७ च्या विजेत्याची घोषणा; मुनव्वर फारुकीने कोरलं ट्रॉफीवर नाव! https://ift.tt/4iwTaqO

मुंबई: गेल्यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला 'बिग बॉस १७'चा खेळ २८ जानेवारी रोजी संपला. गेले तीन महिने च्या घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला आणि आता अखेरीस या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला आहे. या पर्वात टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या आघाडीच्या स्पर्धकांमधून विजेता मिळाला असून या स्पर्धकाचे चाहते आनंदोत्सव साजरा करत आहेत. बिग बॉस १७ ची चमकती ट्रॉफी आणि मोठी रक्कम घेऊन आज हा स्पर्धक घरी जाणार आहे. कोणी जिंकले बिग बॉसचे सतरावे पर्व?कॉमेडियन मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे. पहिल्या दिवसापासूनच अत्यत हुशारीने खेळणारा आणि मोठा चाहतावर्ग असणारा हा स्पर्धक आज BB17 ची ट्रॉफी घेऊन जात आहे. बिग बॉस १७ च्या फायनलिस्टबद्दल बोलायचे झाल्यास मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा हे स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचले होते. त्याआधी टॉप ६ मध्ये अंकिताचा नवरा विकी जैनही पोहोचलेला. मात्र प्रेक्षकांच्या मतांअभावी त्याला घराबाहेर जावे लागले. त्यानंतर २८ जानेवारी रोजी बिग बॉसच्या या नवीन पर्वाला विजेता मिळाला आहे. दरम्यान आजच्या सोहळ्याबद्दल सांगायचे झाल्यास टॉप ५ स्पर्धकांसह बिग बॉस १७ चे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. केवळ अनुराग डोभाल, खानजादी आणि ऑरा हे तीन स्पर्धक ग्रँड फिनाले सोहळ्यात दिसले नाहीत. अगदी काहीच दिवसांपूर्वी अनुरागने असा आरोप केलेला की, बिग बॉसचा हा खेळ आधीपासूनच फिक्स आहे. शिवाय त्याने ट्विटरवरही या खेळाबद्दल नाराजी व्यक्त करत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.Read And


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZkDnFGh

No comments:

Post a Comment