पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर आगमी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा चर्चेत आली आहे. बारामती मतदारसंघात प्रथमच पवार कुटुंबात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे. अशाच खासदार आणि मुलगी यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष यांनी मोठी रणनिती आखली आहे. जर शरद पवारांची रणनिती यशस्वी झाली तर महायुतीच्या उमेदवाराचा मोठा पराभव होऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंडखोरी आणि बारामतीतून उमेदवार उभा करण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी मोठा चाल खेळली आहे. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. जर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार यांच्यासोबत आले तर सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित होईल. सध्या रासप महायुतीत आहे. शरद पवारांनी जानकर आणि रासपला माढा लोकसभेची जागा देण्याची ऑफर दिली आहे. शरद पवार यांचा MJ फॅक्टर चालला तर बारामतीचा गढ सुरक्षीत राहील. याआधीच्या निवडणुकीत रासपने बारामतीत मोठ्या संख्येने मते मिळवली आहेत. स्वत: जानकरांनी २०१४च्या निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती. बारामतीत जर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर तो शरद पवारांचा पराभव मानला जाईल. रासपकडे धनगर समाजाची मते असून त्यांचा प्रभाव देखील जास्त आहे. म्हणूनच जानकर हे पवारांसोबत आले तर सुप्रिया सुळेंची जागा सुरक्षित होईल. निकाल बदलण्याची क्षमता२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ५.२१ लाख मते मिळाली होती. ही मते एकूण मतदानाच्या ४८.८८ टक्के इतकी होती. तर महादेव जानकर यांना ४.५१ लाख इतकी मते मिळाली होती. हे प्रमाण ४२.३५ टक्के इतके होते. २०१४मध्ये भाजपने जानकरांना पाठिंबा दिला होता आणि मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध रासप अशी झाली होती. २००९च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हा रासपच्या उमेदवारास १४ हजार ९१२ मते मिळाली होती. २००४च्या लोकसभा निवडणुकीत रासपला ३० हजार २३० मते मिळाली होती. आता अजित पवारांकडून आव्हान मिळल्यानंतर शरद पवारांनी जानकरांकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. सुप्रिया सुळे यांनी गेल्या ३ निवडणुकीत बारामतीतून विजय मिळवला आहे. माढाची ऑफर का? शरद पवार यांनी खेळलेल्या या डावामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. माढाची जागा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजप ही जागा जानकारांसाठी सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. पवारांनी अत्यंत हुशारीने हा डाव टाकला आहे. यामुळे जानकरांना माढातून लोकसभेवर जाण्याची संधीच मिळाली आहे. २००९ साली माढातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि तेव्हा शरद पवारांकडून त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा जानकरांना ९८ हजार मते मिळाली होती. २०१४साली या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. २०१९ ला मात्र भाजपने विजय मिळवला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KydVj7v
No comments:
Post a Comment