वृत्तसंस्था, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘विकसित भारत : २०४७’ हे व्हिजन डॉक्युमेंट आणि पुढील पाच वर्षांतील कृती आराखडा यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील शंभर दिवसांत तातडीने उचलायच्या पावलांबाबतच्या अजेंड्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीमध्ये तासभर मार्गदर्शन केले. भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणुकीबद्दलचे विचार त्यांनी मांडले. नागरिकांच्या वयोमानानुसार लोकसंख्येत होणारे बदल आणि त्यासोबत येणारी आव्हाने याबद्दलही मोदी बोलले. संबंधित मंत्रालयांनी आपापली रेकॉर्ड तपासावीत आणि भूतकाळात कसे निर्णय घेतले गेले, गेल्या २५ वर्षांत कल्पनांमध्ये कसे बदल झाले याचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही मोदींनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.‘विकसित भारत’साठीचा आराखडा हे दोन वर्षांच्या तयारीचे आणि संपूर्ण सरकारच्या सहभागाचे फलित असून, त्यामध्ये सर्व मंत्रालये, राज्य सरकारे, तज्ज्ञ, औद्योगिक संस्था, नागरी संघटना, वैज्ञानिक संस्था आणि तरुणाईकडून मिळणारी माहिती यांच्यातील व्यापक विचारविनिमयाचा यात समावेश असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ‘विकसित भारत विषयावर आतापर्यंत २७००पेक्षा अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे विविध पातळ्यांवर झाली आहेत. सुमारे २० लाखांपेक्षा अधिक तरुणांकडून सूचना आल्या आहेत,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.‘विकसित भारत’साठी वाटचालीचा आराखडा सर्वसमावेशक ‘ब्ल्यूप्रिंट’ असून, त्यात अत्यंत स्पष्ट राष्ट्रीय दृष्टिकोन, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती करण्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे,’ असे सूत्रांनी सांगितले. या उद्दिष्टांमध्ये आर्थिक प्रगती, शाश्वत विकास उद्दिष्टे, जीवनमान सुलभता, व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण यांचा समावेश असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.निवडणुकीपूर्वीची शेवटची बैठक?पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्रालयांनी त्यांच्या कल्पनांचे सादरीकरण केले. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीची ही शेवटची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची चिन्हे आहेत.बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा- नागरिकांचे सशक्तीकरण आणि शाश्वत अर्थव्यवस्था- भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी २५ वर्षांचा आराखडा- तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये जागतिक नेतृत्व करणे- पुढील पाच वर्षांसाठीचा तपशीलवार आराखडा
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J3WEjYf
No comments:
Post a Comment