Breaking

Friday, February 21, 2025

पाकिस्तानचा खेळाडू ढसाढसा रडायलाच लागला, ड्रेसिंग रुममधला व्हिडिओ झाला जगभरात व्हायरल... https://ift.tt/8bqYB3S

दुबई : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा ज्वर आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यावेळीच पाकिस्तानच्या खेळाडूचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा हा खेळाडू ढसाढसा रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधला हा व्हिडिओ असल्याचे आता समोर आले आले.पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता एकामागून एक धक्के बसायला लागले आहेत. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडू हा चॅम्पियन्स ट्रॉफीबाहेर गेला. पहिल्या सामन्यात संथगतीने गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानवर आयसीसीने कारवाई केली. त्यामध्येच आता त्यांना भारतीय संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे एकामागून एक गोष्टी घडत असताना पाकिस्तानच्या खेळाडूला रडातानाचा व्हिडिओ व्हायरल आता भारताच्या सामन्यापूर्वी व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा हा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये ढसाढसा रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या खेळाडूच्या बाजूला शाहीन आफ्रिदी बसला आहे. शाहीन त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे, पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचा हा खेळाडू मात्र रडतच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या खेळाडूला आपल्याबरोबर काय घडलं आहे, हे समजून चुकल्याचे दिसत आहे. हा रडत असलेला पाकिस्तानचा खेळाडू आहे तो फखर झमान. या व्हिडिओमध्ये झमान हा फलंदाजी करून ड्रेसिंग रुमध्ये येत आहे. ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर झमान हा जबरदस्त रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्यात झमानला दुखापत झाली होती, ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला तब्बल १३५ मिनिटे मैदानाबाहेर राहावे लागले होते. त्यानंतर झमान मैदानात उतरला खरा, पण आयसीसीच्या नियमामुळे त्याला सलामीला जाता आले नाही. त्यानंतर झमान हा फलंदाजीला गेला, पण तो लगेच माधारी परतला. त्यामुळे झमानला रडू कोसळले. दुसरीकडे झमानला आपल्या शरीराची अवस्थाही समजली असावी. कारण या सामन्यानंतर झमानबाबत एक बातमी आली आणि ती म्हणजे तो या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळू शकणार नाही.हा व्हिडिओ पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यातील आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DvZX9Nx

No comments:

Post a Comment