मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात आणि डिझेलच्या किमती जूनमधील तीन आठवडे वाढत होत्या. मात्र सोमवार आणि मंगळवार देशभरात झालेल्या आंदोलनाची दखल पेट्रोलियम कंपन्यांना घ्यावी लागली आहे. एकीकडे देश करोना संकटाशी झुंज देत असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेत निर्माण झालेला असंतोष शांत करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी दरवाढ टाळली आणि पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत कोणतीही वाढ झाली नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ३९.७५ डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात मंगळवारी १.५ टक्क्याची वाढ झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ४१ डॉलर प्रती बॅरल होता. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा भाव शून्याखाली गेला होता. मात्र देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सोमवार वगळता मागील चार दिवसात तीन दिवस इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे तूर्त जनतेला दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही दिवस पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YN9RPm
No comments:
Post a Comment