छत्रपती संभाजीनगर: गंगापूर परिसरातून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे श्याम शेषेराव चव्हाण (३७, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड, जालना), गणेश शांताराम रोकडे (रा. जिकठाण ता. गंगापूर) ,अविनाश रघूनाथ खंडागळे (रा. कानडगांव ता. गंगापूर), बाबासाहेब विष्णू देवकर (रा. सिध्दापूर ता. गंगापूर ) असे आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर परिसरात ट्रक चालकाच्या लुटीच्या घटनेच्या तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ आणि त्यांच्या पथकाने माहिती काढली असता सदर गुन्हा श्याम शेषराव चव्हाण याच्या टोळीने केल्याची माहिती समोर आली. या माहितीवरून पथकाने श्याम चव्हाण याचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीवरून जालना येथे जाऊन सापळा रचून शोध घेतला असता श्याम शेषेराव चव्हाण याला ताब्यात घेतले. श्याम चव्हाण याला विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने ट्रकचालकाला लुटण्याची घटना ही त्याचे साथीदार गणेश शांताराम रोकडे, अविनाश रघूनाथ खंडागळे, विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार बाबासाहेब विष्णू देवकर यांच्यासह केल्याचे कबूल केले. श्याम चव्हाण याने दिलेल्या कबुलीनंतर त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी गणेश शांताराम रोकडे, अविनाश रघूनाथ खंडागळे, बाबासाहेब विष्णू देवकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. लूट मारी करणाऱ्या टोळीला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई गंगापूर पोलीस करत आहे. लुटमारी करणाऱ्या टोळीला अटक करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांच्याा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उप निरीक्षक विजय जाधव, भगतसिंग दुलत, यांच्यासह पोलीस अमलदार नामदेव शिरसाठ, रवी लोखंडे, वाल्मीक निकम, अशोक वाघ, आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे. या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेऊन, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन टाटा झेस्ट, दोन मोटार सायकल, एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राऊंड आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण ४,७६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dEDUPiF
No comments:
Post a Comment