Breaking

Wednesday, June 24, 2020

वाचा: आजच्या ठळक घडामोडी अगदी मोजक्या शब्दांत https://ift.tt/2Vckrx6

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीतर्फे बुधवारी (महाराष्ट्र) घेण्यात आला. श्रीकृष्ण जन्मसोहळा (अष्टमीची पूजा) साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. आज सौदेपूर्ती आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्याला सौदेपूर्ती होण्यापूर्वी बाजारात विक्री होत असते असे दिसून आले आहे. त्यामुळे आजही बाजारात उलथापालथ होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा परिस्थिती नफा वसुली करावी, असा सल्ला जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसचे विश्लेषक विनोद नायर यांनी दिला. एक सकारात्मक बाब अशी की निफ्टी अजूनही १०३०० अंकांच्या स्तरावर आहे. त्याला १००५० अंकांवर सपोर्ट आहे. लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग न घेतल्याने वीज ग्राहकांना विजेचे सरासरी बिल पाठवण्यात आले. मात्र आता तीन महिन्यांनी मीटरचे रीडिंग घेऊन पाठवलेल्या बिलांमध्ये या सरासरी बिलाचे समायोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज ग्राहकांना 'शॉक' बसला आहे. वरून हे बिल सुलभ हप्त्यात भरा, अशी मखलाशीही सरकारकडून केली जात आहे. सर्वसामान्य जनता, सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनीही याबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dybp3I

No comments:

Post a Comment