Breaking

Wednesday, June 24, 2020

तेजीला ब्रेक ; आज शेअर बाजारात काय होणार ? https://ift.tt/2Zb0Oqk

मुंबई : आज सौदेपूर्ती आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्याला सौदेपूर्ती होण्यापूर्वी बाजारात विक्री होत असते असे दिसून आले आहे. त्यामुळे आजही बाजारात उलथापालथ होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा परिस्थिती नफा वसुली करावी, असा सल्ला जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसचे विश्लेषक विनोद नायर यांनी दिला. एक सकारात्मक बाब अशी की निफ्टी अजूनही १०३०० अंकांच्या स्तरावर आहे. त्याला १००५० अंकांवर सपोर्ट आहे. पुढील दिशा ठरवण्याआधी निफ्टीमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. मागील चार सत्रात वधारलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार नफा कमाई करत आहेत. त्यामुळे आजच्या सत्रात हाच ट्रेंड दिसेल, अशी शक्यता कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की मेटल आणि ऑटो क्षेत्रात तसेच इन्फ्रा शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून येईल. जगभरातील बाजारांमधून आलेल्या कमजोर संकेतांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीला सुरुवात झाल्याने सुरुवातीच्या सत्रांमध्ये निर्माण झालेली तेजी गमावली. सत्रांतर्गत व्यवहारांच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५६१.४५ अंकांनी घसरून ३४,८६८.९८च्या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १६५.७० अंकांनी घसरून १०,३५०.३०च्या पातळीवर स्थिरावला. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान निफ्टी १०,५५३.१५च्या उच्चांकी पातळीवर आणि १०,२८१.९५च्या नीचांकी पातळीवर घसरला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंड्सइंड बँकेचा समभाग (७ टक्क्यांहून अधिक) सर्वाधिक घसरला. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, स्टेट बँक आणि भारती एअरटेलचे समभाग कोसळले. दुसरीकडे एशियन पेंट्स, आयटीसी, नेस्ले इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारले. बाजारातील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात बाजार वरच्या पातळीवर उघडूनही कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांक घसरले. युरोपीय बाजार घसरल्याने त्यांचा परिणामही देशांतर्गत शेअर बाजारांवर झाला. पॅरिस, फ्रँकफर्ट आणि लंडनमधील दोन टक्क्यांपेक्षा अधिक कोसळले. आशियाई बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्केईही कोसळला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fWkzbW

No comments:

Post a Comment