Breaking

Sunday, June 28, 2020

इंधन दरवाढ थांबेना ; आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले https://ift.tt/31rFpw6

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. रविवारी एक दिवस इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहे. इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीत आज पेट्रोल ८०.४३ रुपयांवर गेले आहे. त्यात ५ पैसे वाढले. १३ पैशांनी वाढले असून डिझेलचा भाव ८०.५३ रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये ५ पैसे वाढले असून पेट्रोलचा भाव ८७.१९ झाला आहे. मुंबईत डिझेल आज १२ पैशांची वाढ झाली असून डिझेल दर ७८.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे. त्यात सरासरी १२ पैशांची वाढ झाली. मुंबईत शनिवारी पेट्रोल २३ पैशांनी आणि डिझेल २० पैशांनी महागले होते. मागील २१ दिवसांत पेट्रोल सरासरी ९ रुपये तर डिझेल ११ रुपयांनी महागले आहे. दिल्लीत शनिवारी पेट्रोल २५ पैशांनी वाढले तर डिझेलमध्ये २१ पैशांची वाढ झाली होती. सध्या दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेलचा भाव अधिक आहे. गुरुवारी दिल्लीत डिझेलने पहिल्यांदाच ८० रुपयांची पातळी ओलांडली होती. जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे भाव ३८.४९ डॉलर प्रती बॅरल आहेत. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात दरवाढीचे सत्र आणखी किती लांबेल हे सांगणे कठीण असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यान राज्यात परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. पेट्रोलचा दर ८९ रुपयांच्या आसपास आहे. तर नांदेडमध्ये पेट्रोल प्रती लिटर ८९.०७ रुपये आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता. डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाकडून गोवा तसेच इतर राज्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. केंद्र सरकारने इंधनावर वाढवलेले शुल्क कमी करण्याची मागणी केली जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iibVH1

No comments:

Post a Comment