मुंबई : लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. याशिवाय विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच देशभर पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलने झाली. गेल्या सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये शेवटची दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांच्या दर पत्रकानुसार शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून डिझेल दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर सार्वजनिक वाहतुकील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली. जूनमध्ये ११.८ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची विक्री झाली आहे. हे प्रमाण आता टाळेबंदी पूर्व स्थितीवर आले आहे. जूनमध्ये पेट्रोलचा खप ८५ टक्के तर डिझेलचा खप ८२ टक्के झाला. जून २०१९ मध्ये १३.४ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची विक्री झाली होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात शुक्रवारी १.२८ टक्क्याची घट झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ४२.६१ डॉलर प्रती बॅरल होता. त्यात १.२३ टक्के घसरण झाली. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा भाव शून्याखाली गेला होता. मात्र देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. या दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला होता. ...तर महागाईचा भडका उडणार जूनमधील सलग तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत होती. या कालावधीत पेट्रोल किमान ९.१७ पैसे आणि डिझेल ११ रुपयांनी महागले होते. परिणामी माल वाहतूक महागली आहे. इंधन दर जैसे थे असले तरी मागील काही दिवसांत झालेल्या दरवाढीने बाजारात महागाईचा भडका उडेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, बाजारात भाजीपाल्याच्या किंमती वाढु लागल्या आहेत. भाजीपाला, टोमॅटो, कांदे, बटाटे यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. माल वाहतूकदार तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी पेट्रोल-डिझेल महागल्याने दरवाढीचा इशारा दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eZzMJo
No comments:
Post a Comment