जयपूर : एका तरुणीने लिंग बदल करुन आपल्या मैत्रिणीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. लिंग बदलणारी तरुणी जवळपास ७ वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने प्रेमासाठी आपलं लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. तरुणीने १५ लाख रुपये खर्च करुन लिंग बदलं शस्त्रक्रिया केली. लिंग बदल करुन तरुणीने आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं. आता दोघे पती-पत्नी म्हणून मथुरेत एकत्र राहत आहेत. लिंग बदललेल्या तरुणीने ज्या मुलीशी लग्न केलं, ती तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर जयपूर पोलीस तरुणीला शोधत मथुरेत पोहोचले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. मात्र दोघांनीही आम्ही प्रोढ असून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडून लेखी सहमती पत्र लिहून घेत त्यांना सोडून दिलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
भरतपूर इथे राहणारी सविता २०१७ मध्ये जयपूरमध्ये शिक्षणासाठी आली होती. त्यावेळी जवळच राहणाऱ्या एका तरुणीसोबत तिची मैत्री झाली. दोघी सतत एकत्र राहू लागल्या आणि हळूहळू एकमेकींच्या प्रेमात पडल्या. करोना काळात दोघी वेगळ्या झाल्या, पण त्यांचं फोनवर बोलणं होत होतं. २०२१ मध्ये पुन्हा दोघी भेटल्या. दोघींमध्ये प्रेम असल्याने त्यांनी एकमेकींशी लग्न करण्याचा आणि पती-पत्नी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघींमध्ये लिंग बदलण्याची चर्चा होऊ लागली.अखेर दोघींपैकी सविताने लिंग बदलून ती मुलीची मुलगा होणार असल्याचं ठरवलं. सविताने तिच्या डॉक्टर नातेवाईकाकडे याबाबत माहिती घेतली तसंच पैशांची मदतही मागितली. सविताला इंदौरमधील एका रुग्णालयात शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. जवळपास १० महिन्यात तीन वेळा शस्त्रक्रिया केल्यानंतर सविता मुलीची मुलगा झाली. यासाठी तिला १५ लाखांचा खर्च आला. आता लिंग बदलून सविता ही ललितसिंह बनली आहे.कागदोपत्री नावंही बदललं
लिंक बदलल्यानंतर सविता मुलगा झाली. त्यानंतर तिने कागदोपत्री ललितसिंह नाव बदलून घेतलं. त्यानंतर दोघांनी जयपूरमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न केलं.दोघांचं लग्न होण्याआधी काय घडलेलं?
सविता अर्थात ललितसिंहने जिच्याशी लग्न केलं, त्या तरुणीच्या कुटुंबियांना तिचं लग्न झाल्याची बाब माहिती नव्हती. तिचे वडील तिच्या लग्नासाठी मुलगा शोधू लागले होते. मात्र घरी लग्नाची गोष्ट निघाल्यानंतर तरुणीने घरुन शिक्षणासाठी बाहेर जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने आपला फोन बंद केला होता. तिच्या कुटुंबियांनी तिला खूप शोधलं पण ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर १५ जानेवारी रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.लोकेशनद्वारे पोलिसांनी शोधून काढलं
पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिचं शेवटचं लोकेशन शोधण्यात आलं. ते लोकेशन मथुरामध्ये असल्याचं दिसलं. पोलीस तपासासाठी मथुरेत पोहोचले. त्यावेळी त्यांना संपूर्ण प्रकार समजला. मात्र दोघांनी आपण सज्ञान असून आपल्याला एकत्र राहायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना सोडून दिलं.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Lkfzmui
No comments:
Post a Comment